वृत्तसंस्था/ माद्रिद
एटीपी टूरवरील येथे 26 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या माद्रिद खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेतून सर्बियाचा टॉप सिडेड टेनिसपटू नोव्हॅक जोकोविचने माघार घेतल्याची माहिती स्पर्धा आयोजकांनी दिली आहे.
जोकोविचला कोपरा दुखापतीची समस्या जाणवत असल्याने त्याने माद्रिद स्पर्धेत सहभागी होणार नसल्याचे स्पर्धा आयोजकांना कळविले आहे. मे महिन्यात होणाऱ्या फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेसाठी जोकोविच आता आपल्या पूर्ण तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रीत करीत आहे. शुक्रवारी बोस्निया येथे झालेल्या स्पर्धेत 35 वर्षीय जोकोविचला उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सर्बियाच्या लेजोविककडून पराभव पत्करावा लागला होता. 2023 टेनिस हंगामात कोरोना संदर्भातील नियमामुळे जोकोविचला इंडियन वेल्स आणि मियामी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धा आयोजकांनी बंदी घातली होती.









