वृत्तसंस्था/ ऍडलेड
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या ऍडलेड पुरुषांच्या खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत सर्बियाचा माजी टॉप सिडेड जोकोविच तसेच रशियाचा डॅनिल मेदवेदेव्ह यांच्या पुरुष एकेरीत उपांत्य फेरीची लढत होणार आहे.
या स्पर्धेतील शुक्रवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जोकोविचने डेनिस शेपोव्हॅलोवचा 6-3, 6-4 तसेच रशियाच्या डॅनिल मेदवेदेव्हने आपल्याच देशाच्या कॅचेनोव्हचा 6-3, 6-3 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. त्याचप्रमाणे जपानचा निशिओका आणि सेबेस्टियन कोर्दा यांच्यात दुसरा उपांत्य सामना होईल. जपानच्या निशिओकाने पॉपिरीनचा 7-6(7-4), 6-7(8-6), 6-2 असा पराभव केला.









