वृत्तसंस्था/ माँटेकार्लो
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या माँटेकार्लो मास्टर्स पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत सर्बियाच्या टॉप सिडेड जोकोविचने एकेरीची उपांत्य फेरी गाठली. त्याचप्रमाणे इटलीचा सिनेर आणि ग्रीकचा सित्सिपस यांनीही शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळवले आहे.
जोकोविचने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत विक्रमी 77 व्यांदा मास्टर्स टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरी गाठण्याचा पराक्रम केला आहे. माँटेकार्लो स्पर्धेत जोकोविचने ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स डी मिनॉरचा 7-5, 6-4 अशा सेट्समध्ये पराभव केला. अन्य एका सामन्यात इटलीच्या सिनेरने होल्गेर रुनेचा 6-4, 6-7(6-8), 6-3 तर ग्रीकच्या सित्सिपसने रशियाच्या कॅचेनोव्हचा 6-4, 6-2 असा पराभव करत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळविले.









