वृत्तसंस्था/ पॅरिस
सर्बियाचा टॉप सिडेड टेनिसपटू नोव्हॅक जोकोविचने येथे सुरू असलेल्या पॅरिस मास्टर्स पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत एकेरीची अंतिम फेरी गाठली आहे. आता जोकोविच आणि बल्गेरियाचा डिमिट्रोव्ह यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.
या स्पर्धेतील झालेल्या पुरूष एकेरीच्या उपांत्य सामन्यात जोकोविचने रशियाच्या रूबलेव्हचा 5-7, 7-6 (7-3), 7-5 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. जोकोविच आता या स्पर्धेत विक्रमी सातव्यांदा जेतेपद मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे. अलिकडच्या कालावधीत जोकोविचने सलग 17 एकेरीचे सामने जिंकले आहेत.









