वृत्तसंस्था/मॉन्टे कार्लो
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या मॉन्टे कार्लो मास्टर्स पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत चिलीचा बिगर मानांकीत टेनिसपटू अॅलेजेंड्रो टेबिलोने सर्बियाच्या माजी टॉपसिडेड जोकोविचला दुसऱ्याच फेरीत अनपेक्षित पराभवचा धक्का दिला. जोकोविचने यापूर्वी ही स्पर्धा दोनवेळा जिंकली आहे. तर गेल्या महिन्यात मियामी खुल्या टेनिस स्पर्धेत अंतिम फेरीत जोकोविचला पराभवाला सामोरे जावे लागले होते. पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात टेबिलोने जोकोविचचा 6-3, 6-4 असा फडशा पाडत पुढच्या फेरीत स्थान मिळविले. टेबिलोचा जोकोविचवरील क्लेकोर्टवरील स्पर्धेतील हा सलग दुसरा विजय आहे. 37 वर्षीय जोकोविचने एटीपी टूवरील एटीपी मास्टर्स प्रत्येक स्पर्धा किमान तीनवेळा जिंकण्याचा पराक्रम यापूर्वी केला आहे.









