दिवाळी आणि फटाके हे अद्वैत सर्व भारतीयांना माहीत आहे. फटाक्मयांशिवाय दिवाळी ही कल्पनाच आपल्याला सहन होत नाही. अलीकडच्या दहा वर्षात प्रदूषण नियंत्रण हा परवलीचा शब्द बनल्याने फटाक्मयांवर निर्बंध आले आहेत. फटाक्मयांमुळे विषारी धूर तयार होऊन तो वातावरणात मिसळतो आणि वायू प्रदूषण मोठय़ा प्रमाणावर वाढते. याचा विपरित परिणाम विशेषतः बालकांच्या प्रकृतीवर होतो, असे निर्विवादपणे दिसून आले आहे. त्यामुळे न्यायालयांपासून सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत सर्व जबाबदार संस्था नागरिकांना फटाक्मयांपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत असतात. सध्याच्या स्थितीत हे योग्यच म्हटले पाहिजे.

तथापि, मध्यप्रदेशात एक गाव असे आहे की फटाक्मयांचे दुष्परिणाम समजून येण्या आधीपासूनच या गावात झाडांच्या संगे दिवाळी साजरी करण्याची पद्धत रुढ झाली आहे. ही शतकांची परंपरा आहे, असे गावकरी सांगतात. याचाच अर्थ असा की फटाक्मयांची निर्मिती होण्यापूर्वीपासून या गावात पर्यावरणस्नेही दिवाळी साजरी केली जाते. या मानववस्तीचे नाव बागमुगालिया असे आहे. व्यवहार्यता हे ग्राम नाही, शहरीकरण झालेली एक मानववस्ती आहे. येथे राहणारे लोक पूर्वापारपासून दिवाळीला वृक्षारोपण करून पर्यावरणाच्या संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावतात. केवळ झाडे लावणेच नव्हे तर झाडे जगवण्याकडेही लक्ष दिले जाते. त्यामुळे ही वसती दुरूनही हिरवीगार दिसते. या वस्तीचा आदर्श साऱयांनी ठेवल्यास पर्यावरण सुरक्षित राहून यापुढच्या अनेक पिढय़ांना दिवाळी साजरी केल्याचा आनंद घेता येणार आहे. अलीकडच्या काळात या वस्तीचे अनुकरण इतरत्रही होत आहे.









