दिवाळी आणि फराळ हे समीकरण तर ठरलेलंच आहे.प्रत्येकाच्याच घरी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.यावेळी फराळाचे नानाप्रकारे घरी बनवले जातात.आणि ते तितक्याच आवडीने खाल्ले देखील जातात.दिवाळीच्या फराळातील सगळ्यात सोपा आणि पटकन होणार पदार्थ म्हणजे शंकरपाळी .पण जर तुमच्या फराळातील शंकरपाळी मऊ होत असेल, किंवा शंकरपाळीला लेअर्स येत नसतील तर आम्ही आज तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत.चला तर मग जाणून घेऊयात ही परफेक्ट रेसिपी.
कृती
मैदा ४ वाट्या
साजूक तूप १/२ वाटी
पिठी साखर १ वाटी
दूध १/२ वाटी
तळण्यासाठी तेल
साहित्य
सर्वप्रथम एका परातीमध्ये अर्धी वाटी तूप घ्या. (तूप पातळ असावं) नंतर त्यामध्ये १ वाटी पिठी साखर घालावी. (आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता) तूप आणि साखर एकजीव होण्यासाठी ३ ते ४ मिनटं एकसारखी फेटून घ्यावी. यांनतर त्यामध्ये अर्धी वाटी दूध घालून पुन्हा एकदा फेटून घ्यावं.दूध ,साखर आणि तूप या मिश्रणात मैदा घालावा.आणि सर्व मिश्रण एकत्र करून पीठ मळून घ्यावं. पीठ घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये एक चमचा दूध घालून पीठ मऊ करून घ्यावे.पिठाचे मोठे गोळे करून जाडसर लाटून घ्यावेत.आणि सुरीने शंकर पाळीचे चौकोनी आकार कापून घ्यावेत. यांनतर गॅस वर तेल गरम करत ठेवावे. तेल तापल्यानंतर त्यात शंकरपाळीचे काप सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यावेत.यावेळी गॅस हा मंद आचेवर असावा.अशी ही भरपूर लेअर्स वाली, खुसखुशीत आणि कमी तेलकट असणारी शंकरपाळी या दिवाळीला तुम्ही देखील नक्की ट्राय करा.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









