लहान मुलांच्या तयार कपडय़ांना जास्त मागणी
सांखळी / प्रतिनिधी
राज्यात दिवाळीची चाहूल लागली असून गोव्यातील बाजारपेठा दिवाळीला लागणाऱया सामानाने भरत आहेत. हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला असला तरी नागरिकांची सकाळच्यावेळी बाजारपेठांमध्ये खरेदीसाठीची गर्दी वाढली आहे. सोमवारी सांखळी शहराच्या आठवडा बाजारात दिवाळीनिमित्त लागणाऱया उपयुक्त वस्तू उपलब्ध होत्या. तसेच सुकी मासळी इतर सामन खरेदीसाठी मोठी गर्दी होती.
दिवाळी निमित्त लागणाऱया वस्तू उपलब्ध
सांखळी आठवडा बाजारात सोमवारी दिवाळी निमित्त लागणाऱया पणती, रांगोळी, लक्ष्मीचे फोटो, रांगोळी काढली जाणारे फॉर्म, आकाशकंदील, कंदमुळे, इत्यादी अनेक वस्तू विक्रीसाठी उपलब्ध होती. आता बाजारपेठेच्या बाहेरही समान उपलब्ध होत असल्याने पणती विक्रीचा पारंपरिक व्यवसाय करणाऱयाना त्याचा फटका बसत असल्याचे होंडा येथील पणती व्यवसाय करणाऱया महिलेने या विषयी बोलताना सांगितले.
गावठी भाजीपाला ,कंद मुळांना ही जास्त मागणी
सांखळी आठवडा बाजारास विविध प्रकारची फळे गावठी भाजी, रान फळे, कांदे, कंदमुळं बटाटे, टोमॅटो, विविध भाजी, मिरची, मसाले, सोल, केळी, सुपारी, नारळ, उपलब्ध होती त्यास विपेत्याकडून मोठी मागणी होती. लहान मुलांना जास्त कपडे लागत असल्याने तयार कापडय़ाना ही जास्त मागणी होती.
मातीच्या वस्तू, बांबुच्यावस्तूही बाजारात
सांखळी आठवडा बाजारास स्थनिक मातीच्या वस्तू आणि बांबुच्या वस्तू विपेत्यांनी आपल्या विविध वस्तू बाजारात विक्रीसाठी आणल्या होत्या, अशा वस्तुंना ही बाजारात जस्त मागणी असते, कुंडली,पणती, मिलेर , इत्यादी तसेच पाटला,सूप,इत्यादी विक्रीसाठी उपलब्ध होत्या.









