25 हून अधिक कुटुंबांना आकाश कंदील, फराळ, सुगंधी उटणे, साबण, तेलासह स्त्रियांना साडय़ा भेट
प्रतिनिधी/ बेळगाव
जायंट्स सखीतर्फे मागील सहा वर्षांपासून दुर्गम भागातील नागरिकांना दिवाळी साजरी करता यावी, यासाठी गरजू कुटुंबांना मदत केली जाते. आजरा तालुक्मयातील किटवडे या गावातील गरजूंना मदत करण्यात आली. बेळगावपासून अंदाजे 75 किलो मीटर अंतरावर असलेल्या दुर्गम गावात 2 ते 3 किलो मीटर पायपीट करत फराळ व इतर साहित्य पोहोचविण्यात आले.
या गावामध्ये 25 हून अधिक कुटुंबे असून त्यांना आकाश कंदील, फराळ, सुगंधी उटणे, साबण, तेल गावातील प्रत्येक स्त्रियांना साडय़ा भेट देण्यात आल्या. जायंट्स सखीच्या सदस्यांनी तेथील प्राथमिक शाळेला भेट देवून विद्यार्थ्यांना 4 हजार रुपयांची आर्थिक मदत केली. या उपक्रमामुळे गावात आनंदाचे वातावरण तयार झाले. गावातील शिक्षक उत्तम कोकितकर यांनी गावकऱयांच्यावतीने जायंट्स सखीचे आभार मानले. यावेळी संस्थापक अध्यक्षा ज्योती अनगोळकर, अध्यक्षा चंद्रा चोपडे, उपाध्यक्षा विद्या सरनोबत, फेडरेशन संचालिका नम्रता महागावकर, माजी अध्यक्षा नीता पाटील, सुलक्षणा शिरोळकर, वृषाली मोरे उपस्थित होत्या.









