प्रतिनिधी / बेळगाव
जायंट्स मेनतर्फे खानापूर तालुक्मयातील जांबोटीपासून आठ कि.मी. अंतरावरील चापोली या अति दुर्गम भागात असलेल्या पंचवीस एक गरीब धनगर कुटुंबांना त्यांच्यासमवेत दिवाळी साजरी करण्याच्या हेतूने विविध वस्तू देऊन मदत करण्यात आली. बेळगावपासून अंदाजे 30 कि.मी. अंतरावर असलेल्या 5 कि.मी. डोंगर नाल्यातून पायपीट करून मिठाईचे बॉक्स व इतर साहित्य पोचविण्यात आले.
या धनगरवाडीत 25 हून अधिक कुटुंबे असून त्यांना मिठाई, बिस्किट्स, चॉकलेट्स, एक किलो तेल पाकीट, रांगोळी, पणत्या, आकाश कंदील व कपडे यांचे वाटप जायंट्स अध्यक्ष शिवकुमार हिरेमठ यांच्या हस्ते करण्यात आले. हिरेमठ हे गेली 36 वर्षे जायंट्सच्या माध्यमातून तळागाळातील गरिबांकरिता असे अनेक उपक्रम साजरे करत आहेत. या उपक्रमाने गावामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होऊन गावातील अनेक ज्ये÷ांनी जायंट्सच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
इतक्मया वर्षात प्रथमच जायंट्स संस्थेने दुर्गम भागात पायपीट करून भेट दिली. याप्रसंगी जायंट्सचे संचालक पद्मप्रसाद हुली, आनंद कुलकर्णी व तालुक्मयातील शिक्षक एन. पी. रेडेकर उपस्थित होते.









