प्रतिनिधी, कोल्हापूर
Kolhapur News: चंदगड तालुक्यातील 48 गावातील हेरे संरजाम वतनाची 16 हेक्टर जमिन वर्ग-2 मधून वर्ग-1 मध्ये रुपांतर करण्याची प्रक्रिया येत्या तीन महिन्यात पूर्ण करावी, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बुधवारी गडहिंग्लजचे प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांना दिले.यामुळे गेल्या वीस वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागून या शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
हेरे सरंजाम जमिनीचे वर्ग-2 मधून वर्ग-1 मध्ये रुपांतर करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, गडहिंग्लजचे प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष गणेश फाटक, ऍड. एस.एस. खोत, आंदोलक शेतकरी राजेंद्र कापसे, धोंडिबा चिमणे, रणजीत गावडे, अनिल रेंगडे, महादेव मंडलिक, अभय देसाई, महादेव प्रसादे, रवी नाईक आदी उपस्थित होते.
बैठकीत झालेल्या चर्चेनुसार चंदगड तालुक्यातील 48 गावातील हेरे सरंजाम वतनाची सुमारे 16 हजार हेक्टर जमिन संबंधित शेतकऱ्यांच्या नावावर झाली आहे.परंतु त्यावरील वर्ग-2 चा शेरा कायम आहे. यासंदर्भात गेल्या वीस वर्षापासून पाठपुरावा सुरु आहे, परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. याबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी येत्या तीन महिन्यात ही जमिन वर्ग-1 करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, या जमिनी वर्ग-1 करण्यासाठी सर्व तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी प्रत्येक गावचावडीवर जाऊन संबंधित जमिनधारक शेतकऱ्यांकडील सर्व जुने रेकॉर्ड तपासून जागेवरच नोटीसा काढून 200 पट रक्कम भरुन घेऊन या जमिनींचे वर्ग-1मध्ये रुपांतर करुन घ्यावे, असे आदेश प्रांताधिकारी वाघमोडे यांना दिले. तसेच यातील काही जमिनी खरेदी विक्री किंवा हस्तांतरीत झाल्या असतील तर त्या जितक्या वेळा शर्थभंग झाल्या, तितक्या प्रमाणात शासन निर्णयानुसार रक्कम भरुन घ्यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
अधिक वाचण्यासाठी- झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला युवतीचा मृतदेह,लक्ष्मी टेकडी येथील घटना
तसेच हेरे सरंजामच्या 6 हजार हेक्टर जमिनीवर कसणारी बेदखल कुळे आहेत. त्या कुळांच्या कागदपत्रांसह पुराव्यांची शहानिशा करुन या जमिनी त्यांच्या नावावर कराव्यात, त्यानंतर त्या वर्ग-1 करुन घ्याव्यात, असेही आदेश यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. प्रांताधिकारी वाघमोडे यांनी दिवाळीनंतर या प्रक्रियेला सुरुवात केली जाईल असे सांगितले. तसेच तालुक्यातील मंडल अधिकारी, तलाठी यांच्यासह आवश्यकतेनुसार बाहेरीलही तलाठी व मंडल अधिकारी यांना घेऊन हे काम युध्दपातळीवर पूर्ण केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









