दिवाळी अॅडव्हान्स म्हणून 12 हजार 500 रुपये
मुंबई :
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या सुमारे 85 हजार कर्मचारी आणि अधिक़ार्यांना दिवाळी भेट म्हणून 6 हजार ऊपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी जाहीर केला. तसेच कर्मच़ार्यांच्या वेतन वाढीचा फरक वेतनासोबत देण्यासाठी महामंडळाला दरमहा 65 कोटी ऊपये देण्याचा आणि पात्र कर्मच़ार्यांना दिवाळी अग्रीम म्हणून 12 हजार 500 ऊपये देण्यात येणार असल्याचेही शिंदे यांनी घोषित केले.
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत आज सह्याद्री अतिथीगफह येथे एसटीच्या सर्व कर्मचारी संघटनांची आणि कृती समितीची बैठक पार पडली. यावेळी शिंदे म्हणाले, राज्यात अतिवफष्टीमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. तरीही एसटी कर्मच़ार्यांची दिवाळी गोड झाली पाहिजे म्हणून सरकारने आज हा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर एसटीला आर्थिकदृष्ट्या समफद्ध करणे गरजेचे आहे. एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी खासगी शासकीय सहभागी तत्वावर एसटीच्या जागांचा विकास करण्यात येणार आहे.
एसटीचे सर्व कर्मचारी आणि अधिक़ार्यांना दिवाळी भेट म्हणून 6 हजार ऊपये देण्यासाठी सरकारने सुमारे 51 कोटी ऊपये अनुदान देण्याचे मान्य केले आहे. तसेच सन 2020 -24 दरम्यानच्या वेतन वाढतील फरकाची रक्कम कर्मच़ार्यांना दरमहा वेतनासोबत देण्यात येणार असून यासाठी सरकारने 65 कोटी ऊपयांची तरतूद केली आहे. याशिवाय जे पात्र कर्मचारी सण अग्रीम घेण्यास इच्छुक आहेत त्यांना देखील पूर्वीप्रमाणे 12 हजार 500 ऊपये देण्यात येणार आहेत. त्यासाठी शासनाकडे 54 कोटी ऊपयांची मागणी एसटी महामंडळाने केल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी दिली.
या बैठकीला उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, एस. टी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.









