Diwali Food : दिवाळीचा फराळ जवळपास सर्वांचा करून झाला असेल, सोबत खरेदीची धामधुम सुरुही असेल. दिपावली संपताच अर्थात दिवाळी पासूनच. पण घरातील दिवाळी साजरी करून सुट्ट्यांचा खरा काळ सुरु होतो. मामाच्या गावी जाण्यासाठी बच्चे कंपनी तर आधीच तयारीत असतात. त्यातच गावाकडील थंडी म्हणजे बापरे असेच म्हणायची वेळ येते. दिवाळीचा फराळ तर असतोच पण थंडीत गरम- गरम वाफाळलेल्या चहा सोबत टेस्टी बिस्कीट असतील तर .. तोंडाला पाणी सुटलं ना. चला तर मग अगदी सोप्या पध्दतीने घरच्या घरी कढईत नान कटाई कशी बनवायची याची रेसीपी सांगणार आहोत.चला जाणून घेऊय़ा.
साहित्य
वनस्पती तूप- 1 वाटी
बारीक केलेली साखर -दीड वाटी
मैदा- 2 वाटी
वेलची पावडर-1 चमचा
बेसन पीठ- पाव वाटी
रवा – पाव वाटी
बेकिंग पावडर- 1 छोटा चमचा
चवीपुरत मीठ
कृती
सुरुवातीला एका बाऊलमध्ये एक वाटी तुप घाला. आता त्यामध्ये बारीक केलेली साखर घाला. आता तुप आणि साखर एकत्र करून एकजीव करून घ्या. आता त्यात 2 कप बारीक मैदा घाला . त्यानंतर त्यात बेसन पीठ, रवा, वेलची पावडर, बेकिंग पावडर, मीठ घाला. आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्या.हा पिठाचा गोळा जादा घट्ट मळू नका. आता गॅसवर कढई ठेवा. त्या कढईत एक जाळी ठेवा. कढई गरम होईपर्यत पिठाचे एकसारखे गोळे करून घ्या. हाताने बिस्कीटसारखा त्याला आकार द्या. त्यावर थोडे ड्रायफ्रूट घाला. एका ताटीत बटर पेपर घेवून त्याला थोडे तूप लावा. साधारण पाव इंचाचे अंतर सोडून बिस्किटे ठेवून द्या. आता गरम कढईत बिस्किटचे ताट ठेवून त्यावर झाकण ठेवा. साधारण 20 ते 25 मिनिटे मंद आचेवर बिस्किटे बेक करण्यासाठी ठेवा. 15 मिनिटे झाल्यावर एकदा चेक करा. खालून खरपूस भाजली की बिस्किटे कढईतून बाहेर काढा. थोडी थंड झाली की बटर पेपरमधून बिस्किट बाजूला ठेवून द्या. आता ही तयार बिस्किटे तुम्ही चहा सोबत खाऊ शकता.
टीप- पीठ मळताना पाण्याचा किंवा दुधाचा वापर करू नका
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









