भारतात 48 वे तर कर्नाटकात सहावे स्थान
बेळगाव : गुजरातमधील अहमदाबाद येथे घेण्यात आलेल्या 35 व्या एमपीएल राष्ट्रीय यू-7 वयोगटाच्या बुद्धिबळ स्पर्धेत एमव्हीएम स्कूलचा विद्यार्थी दिव्यांश तल्लीमनी याने यश संपादन केले. या स्पर्धेत भारतातून बुद्धिबळपटूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत यश संपादन करुन दिव्यांश तल्लीमनीने देशात 48 वे तर कर्नाटकात सहावे स्थान पटकाविले. एवढय़ा लहान वयात बुद्धिबळ स्पर्धेत यश संपादन करणारा दिव्यांश हा बेळगावचा पहिला बुद्धिबळपटू आहे. त्याला राष्ट्रीय बुद्धिबळपटू श्रेयश कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तो टीएएफआय बुद्धिबळ संघटनेत सराव करत आहे.









