सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत
दाक्षिणात्य चित्रपट आता पॅन इंडियासाठी निर्माण केले जात आहेत. लवकरच दाक्षिणात्य कलाकारांसोबत ‘जटाधरा’ या चित्रपटात सोनाक्षी सिन्हासोबत दिव्या खोसला देखील दिसून येणार आहे. निर्मात्यांनी दिव्याच्या लुकचे एक पोस्टर शेअर केला आहे. तसेच्या तिच्या व्यक्तिरेखेबद्दल माहिती दिली आहे.
जटाधरा चित्रपटाचे निर्मात्यांनी शेअर केलेल्या पोस्टरमध्ये दिव्या ही साडीत दिसून येत आहे. तसेच पोस्टरवर तिच्या व्यक्तिरेखेचे नाव सितारा असे नमूद आहे. या चित्रपटात सुधीर बाबू मुख्य भूमिकेत आहेत. ते एका शिवभक्ताची व्यक्तिरेखा यात साकारत आहेत. या चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित करण्यात आला असून यातील सोनाक्षीच्या लुकची चर्चा होत आहे.
जटाधरा हा चित्रपट एका पौराणिक कहाणीवर आधारित आहे. प्रेरणा अरोडा यांच्याकडून निर्मित आणि व्यंकट कल्याण तसेच अभिषेक जायसवाल यांच्याकडून दिग्दर्शित या चित्रपटात आकर्षक व्हीएफएक्स पहायला मिळणार आहे. हा चित्रपट चालू वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होणार आहे.









