‘ओट्टा’ चित्रपटात मुख्य भूमिकेत
बॉलिवूड अभिनेत्री दिव्या दत्ता लवकरच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. दिव्या लवकरच मल्याळी चित्रपट ‘ओट्टा’द्वारे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे. अकॅडमी पुरस्कार विजेते साउंड डिझाइनर रेसुल पुकुटी यांचे या चित्रपटाद्वारे दिग्दर्शकीय पदार्पण होणार आहे. दिव्या दत्ता स्वत:च्या पहिल्या दाक्षिणात्य चित्रपटासाठी अत्यंत उत्सुक आहे.

दाक्षिणात्य चित्रपटाच्या सेटवर काम करण्याचा अनुभव अद्भूत होता, कारण तेथे प्रत्येक जण मदत करण्यास तत्पर होता. टीमने मला एक प्रॉम्प्टर दिला होता, परंतु त्याचे लिखाण वाचून अभिनय करणे अवघड होते. सेटवर एक सहकारी मला संवादफेक करण्यासाठी प्रेरित करत होता. आता माझ्यासाठी विविध भाषांमधील चित्रपट करणे अवघड ठरत असल्याचे दिव्या सांगते. दिव्याने बॉलिवूडमध्ये स्वत:च्या अभिनयाद्वारे स्थान निर्माण केले आहे. दिव्याला तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जाते.









