कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरण्यात यशस्वी, हम्पीची टिंगजी लेईशी बरोबरी, आता टायब्रेकरवर निकाल
वृत्तसंस्था/बटुमी, जॉर्जिया
आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुखने येथे झालेल्या फिडे महिला विश्व बुद्धिबळ चषकाच्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात माजी विश्वविजेत्या चीनच्या झोंगयी तानला पराभूत करून आणि एकंदर लढत 1.5-0.5 अशा फरकाने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. या प्रक्रियेत दिव्या पॅंडिडेट्स स्पर्धेत स्थान मिळवणारी पहिली भारतीय ठरली आहे.
अंतिम फेरीत स्थान मिळवल्याने पुढील वर्षी होणाऱ्या महिला पॅंडिडेट्स स्पर्धेतील दिव्याचा प्रवेश निश्चित झाला आहे. कँडिडेट्स स्पर्धेतून विद्यमान महिला विश्वविजेती वेनजुन जूची आव्हानवीर निश्चित होईल. क्वार्टरफायनलमध्ये दुसऱ्या मानांकित झोनर झू आणि नंतर सहकारी ग्रँडमास्टर डी. हरिका यांना पराभूत केल्यानंतर, दिव्या या स्पर्धेत जायंट किलर ठरली आहे आणि तानविऊद्धचा तिचा सामना तिच्या वाढत्या बुद्धिबळ कौशल्याचा पुरावा होता. बुद्धिबळाच्या जगात भारतीय मुलांनी चांगली प्रगती केली आहे, त्यांच्यापाठोपाठ आता ठसा उमटविण्याची वेळ मुलींची असून त्यादृष्टीने आर. वैशालीनंतर दिव्या ही चमक दाखविलेली नवीन मुलगी आहे.
दिव्याने वापरलेल्या युक्त्या आणि रणनीतीमुळे पांढऱ्या रंगाच्या सोंगाट्या घेऊन खेळताना तिचे पारडे जड ठरले. खेळाच्या मधल्या टप्प्यात तानला संधी मिळाल्या होत्या, पण माजी महिला विश्वविजेत्या खेळाडूला त्यांचा फायदा घेता आला नाही हा सामना 101 चालींपर्यंत चालला. दुसऱ्या उपांत्य फेरीत कोनेरू हम्पीने अव्वल मानांकित चीनच्या टिंगजी लेईशी बरोबरी साधली. पांढऱ्या सोंगाट्या घेऊन खेळताना हम्पीने स्लाव्ह डिफेन्सचा सामना केला आणि एक्सचेंज व्हेरिएशन निवडले. हम्पीला सुऊवातीच्या खेळातून काही विशेष फायदा मिळाला नाही आणि 75 चालींनंतर गुण विभागून घेण्याची पाळी दोन्ही खेळाडूंवर आली. हम्पी आता लेईविऊद्ध टायब्रेकर खेळेल.









