इंग्रजी व गणितच्या बहि:स्थ परीक्षेत राज्यात आली तृतीय
कुडाळ / वार्ताहर
इंग्रजी व गणित विषयाच्या बहि:स्थ परीक्षेत राज्यात तृतीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल चेंदवण येथील श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालयाची दहावीतील विद्यार्थिनी दिव्या दत्तात्रय बर्वे हीचा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) कवठी शाखेच्यावतीने सत्कार करण्यात आला. शिवसेना कवठी शाखेच्यावतीने दरवर्षी ज्याप्रमाणे दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्याचा त्यांच्या त्यांच्या घरी जाऊन त्यांचा गौरव केला जातो. तसेच त्याचे व त्यांच्या पालकांचे कौतुक केले जाते. त्या प्रमाणे भारती विद्यापीठ ( पुणे ) यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इंग्रजी व गणित विषयाच्या बहि:स्थ परीक्षेत दिव्या बर्वे हिने राज्यात तृतीय क्रमांक पटकावला.या तिच्या यशाचे कौतुक करण्यासाठी कवठी शिवसेना शाखेच्या वतीने तिचा घरी जाऊन पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला.कवठी उपपसरपंच ऋतुजा खडपकर, माजी सरपंच रूपेश वाडयेकर, ग्रामपंचायत सदस्य नंदकिशोर वाडयेकर, भूषण बांदेकर, सौ. सविता बांदेकर, सौ. ममता वाडयेकर तसेच एकनाथ बांदेकर, राजन खोबरेकर, प्रविण वाडयेकर, दिपक सांगळे, महेश वाडयेकर, महेश वाडयेकर, रूपेश खडपकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.









