घटस्फोट घेतल्यास मिळते शिक्षा
विवाहानंतर घटस्फोट एक कायदेशीर प्रक्रिया असून याच्या अंतर्गत एका राहणारे पती-पत्नी विभक्त होत असतात. जगातील अनेक देशांमध्ये घटस्फोटावरून वेगवेगळ्या कायदेशीर प्रक्रिया निर्धारित करण्यात आल्या आहेत. परंतु एक देश असा आहे, जेथे पती-पत्नीची इच्छा असूनही घटस्फोट घेऊ शकत नाहीत.
फिलिपाईन्स या देशात घटस्फोटाला कायदेशीर मान्यता नाही. येथे पती-पत्नीचे नाते कितीही बिघडले असले तरीही घटस्फोट घेऊ शकत नाहीत. फिलिपाईन्सच्या लोकांसाठी ही प्रक्रिया इतकी जटिल आहे की ते विदेशात राहत असतानाही घटस्फोट घेऊ शकत नाहीत. जर विदेशात घटस्फोट घेऊन विभक्त झाले तरीही फिलिपाईन्समध्ये याला कायदेशीर मान्यता दिली जात नाही.

फिलिपाईन्समध्ये घटस्फोटाला कायदेशीर मान्यता न देण्यामागे धार्मिक व्यवस्था कारण आहे. फिलिपाईन्सच्या सरकारने अनेकदा घटस्फोटाला कायदेशीर मान्यता देणारे विधेयक आणले परंतु ते लागू करणे सोपे नाही. अशा स्थितीत येथे सेपरेशनची व्यवस्था करण्यात आली आहे. फिलिपाईन्समध्ये विवाहित जोडपे काही विशेष परिस्थितींमध्ये वेगवेगळे राहू शकतात, परंतु याला घटस्फोट मानले जाणार नाही आणि दोघांनाही दुसऱ्या विवाहाची अनुमती नसेल.









