जायन्टस ग्रुप ऑफ पणजीतर्फे जागतिक परिचारिकादिन
पणजी : परिचारिका हा एक उदात्त व्यवसाय आहे. परिचारिकांचे कार्य हे ऊग्णांची काळजी घेणे यापुरतेच मर्यादित नसते तर ऊग्णांमध्ये एखाद्या रोगाविऊद्ध लढण्याचा आत्मविश्वास निर्माण करणे आणि ऊग्णांमध्ये प्रेम, जिव्हाळा निर्माण करणे होय. परिचारिकांचा ऊग्णांसोबत चांगला संपर्क असतो. परिचारिकांकडे प्रचंड प्रमाणात ज्ञान आणि वैविधपूर्ण कौशल्ये असतात. हा कार्यक्रम घडवून आणल्याबद्दल जायन्ट्स ग्रुप ऑफ पणजीने खरोखरोच सामाजिक कार्याचे दर्शन घडविले आहे, असे गौरवोद्गार प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. गोविंद घनश्याम कामत यांनी काढले. जायन्ट्स ग्रुप ऑफ पणजीतर्फे जागतिक परिचारिका दिवस पणजी येथील फोमेंतो सभागृहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कामत बोलत होते. यावेळी ग्रुपचे अध्यक्ष अनुप गावणेकर, माजी अध्यक्ष राजेंद्र कामत, सदस्य उमेश प्रभुगांवकर, संदीप नाडकर्णी, वृषाली प्रभुगांवकर, बिपीन कारापूरकर, रोहिदास वायगंणकर, राजू चोडणकर, प्रदीप नाईक, संजय गांवकर, दीपक सौझा उपस्थित होते. जायन्ट्स ग्रुप ऑफ पणजीचे अध्यक्ष गावणेकर म्हणाले, परिचारिका ह्या आरोग्यसेवेतील महत्त्वपूर्ण घटक आहेत. ऊग्णांची सेवा करताना प्रसंगी आपल्या संसाराकडे, घराकडे दुर्लक्ष करून त्यांना जबाबदारी पार पाडावी लागते. त्यांचे योगदान हे आपल्या कोरोना संकट काळात प्रकर्षाने दिसून आले आहे. त्यांची सेवा ही ऊग्णांसाठी महत्त्वपूर्ण ठरते. त्यामुळे त्यांचा सन्मान होणे गरजेचे असल्यानेच जायन्ट्स ग्रुप ऑफ पणजीतर्फे परिचारिकांच्या कार्याची दखल घेण्यात आली, असेही गावणेकर यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरवातीला अनुप गावणेकर यांनी स्वागत केले. राजेंद्र कामत यांनी मान्यवरांची ओळख करून दिली. भालचंद्र आमोणकर यांनी सूत्रसंचालन केले. शुक्र उसगांवकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला जायन्ट्स सदस्य, सत्कारमूर्तींचे नातेवाईक, मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सन्मानित परिचारिका….
मोनिका इफि पि बारबोसा, (वॉर्ड सिस्टर, गोमेकॉ), कऊणा अऊण महाले, (वॉर्ड सिस्टर गोमेकॉ), सियारा इफी फेरणानंदेझ (सहाय्यक मॅट्रॉन, गोमेक), शरद सुभाष दळवी, (वॉर्ड सिस्टर गोमेकॉ), शामल नाटेकर (सहाय्यक मॅट्रॉन, गोमेकॉ), सरिता सुर्लकर (सहाय्यक मॅट्रॉन, गोमेकॉ), सिमा (मार्गरेट), संतोष बोरकर (वरिष्ठ परिचारिका, घनश्याम हॉस्पिटल) यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन जागतिक परिचारिकादिनानिमित्त सन्मान करण्यात आला.









