सावंतवाडी प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा कारभार लोकाभिमुख आहे की नाही.रुग्णालयात दाखल झाल्यानंतर रुग्णांना कशा सुविधा मिळतात .काय अडचणी आहेत. डॉक्टर्स ,नर्स ,रुग्णालयातील स्टाफ यांची वागणूक रुग्णांशी कशी आहे हे जाणून घेण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांना जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील भेट देत आहेत . सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालय येथे त्यांनी गुरुवारी अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी औषध पुरवठा, रक्तपेढी तसेच दाखल रुग्णांची चौकशी केली. या रुग्णालयाचा परिसर आणि येथील कामकाज उत्तम दर्जाचे असल्याचा निर्वाळा डॉ पाटील यांनी दिला .औषध पुरवठा सुरळीत उपलब्ध व्हावा तसेच स्टॉक कमी पडू नये यासाठी ॲपद्वारे मागणी करण्याच्या सूचना त्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर श्री चौगुले यांना केल्या. रक्तपढीमध्ये सकाळी 9 ते 11 या वेळेतील वाढत्या रुग्णांची गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने वेळेत काही बदल करता येईल का ? या दृष्टीनेही त्यांनी चर्चा केली. रुग्णालयाचा कारभार पारदर्शक व सर्व रुग्णांची योग्य व वेळेत तपासणी होण्याच्या दृष्टीने नवीन बदल करण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणा या ठिकाणी कार्यरत आहेत का याची तपासणी केली. शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांच्या गुप्त व अकस्मित भेट अभियानामुळे रुग्णालय प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ चौगुले. डॉ ज्ञानेश्वर ऐवळे , डॉ. वझराटकर. डॉ. सागर जाधव ,वरिष्ठ परिचारिका आदी कर्मचारी उपस्थित होते.









