सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी
सिंधुदुर्गचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यांची पदोन्नती झाली असून त्यांना सिंधुदुर्ग मधेच जिल्हा शल्य चिकित्सक पदी नियुक्ती देण्यात आली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ बाळासाहेब नागरगोजे यांची कोल्हापूर उपचालक कार्यालयात बदली झाली असून अद्याप त्यांना पदस्थापना देण्यात आलेली नाही.
डॉ श्रीपाद पाटील हे गेली २३ वर्षे रुग्णालयीन आरोग्य सेवेत असून मागील तीन वर्षे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक पदावर कार्यारत आहेत. विशेष म्हणजे कोरोना काळातील दोन वर्षे जिल्हा शल्य चिकित्सक पद रिक्त होते. त्यावेळी त्याच्याजवळच जिल्हा शल्य चिकित्सक पदाचा कार्यभार सोपविण्यात आला होता. त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे त्यावेळी कार्यभार संभाळला होता. जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालयामध्ये कोरोना काळात ऑक्सीजन प्लांट उभे राहण्यासाठो फार मेहनत घेतली दिवस रात्र ते सेवा देत होते.
रुग्णसेवेला त्यांनी कायम प्राधान्य दिले त्याच बरोबर रुग्णालयीन प्रशासना मधेही त्यानी चांगले काम केलेले होते. त्यांना पदोन्नती दिली गेल्यास सिंधुदुर्ग मधेच देण्यात यावी अशी जनतेची मागणी होती. अखेर डॉ श्रीपाद पाटील यांना पदोन्नती देण्यात येऊन शासनाने सिंधुदुर्गमधेच जिल्हा शल्य चिकित्सक पदी नियुक्ती दिली आहे . तसेच जिल्हा रुग्णालयातील भुलतज्ञ डॉ अपर्णा गावकर यांची मुंबईत सहायक संचालक आरोग्य सेवा कुटूंब कल्याण या ठिकाणी येथे बदली झाली आहे.









