District Superintendent of Police Rajendra Dabhade; Pawan Bansod’s appointment postponed!
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक पदी पवन बनसोड यांची नियुक्ती स्थगित करण्यात आली असून जिल्हा पोलीस अधीक्षकपदी राजेंद्र दाभाडे यांना पुढील आदेश होईपर्यंत त्याच सिंधुदुर्गातच कार्यभार सभाळण्याचे आदेश गृहखात्याने दिले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांना पुनर्नियुक्तीच्या प्रतीक्षेत ठेवण्यात आले होते. परंतु पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार तूर्तास या बदलीच्या आदेशांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांचा पदभार पुढील आदेश मिळेपर्यंत जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याकडेच राहणार आहे.
तसेच औरंगाबाद ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांची सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती देण्यात आली होती त्यांची नियुक्ती स्थगित करण्यात आली आहे.
सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी









