Kolhapur News : कागल तालुक्यातील हणबरवाडी येथील रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रियेसह सर्व तांत्रिक बाबी पूर्ण झाल्या असताना देखील कामाची वर्क ऑर्डर का दिली नाही याबाबत खासदार संजय मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पाटील यांना जिल्हाधिकारी कार्यालय बाहेरच जाब विचारला. कोणाच्या सांगण्यावरून आपण वर्क ऑर्डर देण्यास टाळाटाळ करत आहात असे खडे बोल सुनावत पाटील यांना त्यांनी धारेवर धरले.यावेळी बाचाबाची झाली. यामुळे काहीकाळ येथील वातावरण तंग झाले.यामुळे शिंदे सेनेत आणि राष्ट्रवादीत मोठी धुसपुस सुरु झालीय.राष्ट्रवादीला घेऊन अडचण झाल्याचाही चर्चा रंगली आहे.
कागल तालुक्यातील हणबरवाडीतील कडगाव,बेकनाळ,बाळेघोल येथील रस्त्याच्या कामाची निविदा खासदार मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांमार्फत भरली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमानुसार त्यांनी सदरची निविदा सर्वाधिक कमी रकमेने भरली आहे. तरी देखील कार्यकारी अभियंता पाटील यांनी नियमानुसार त्यांच्या नावे वर्क ऑर्डर काढली नाही याबाबत मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांनी पाटील यांना जाब विचारला असता सदरची वर्क ऑर्डर देऊ नये असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यासंदर्भात शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजेखान जमादार यांच्याशी संपर्क साधला. यावेळी तरुण भारत संवादशी बोलताना जमादार म्हणाले, विकासाकामांना अडथळा का आणताय, काम नियमित असून देखील का थांबवलं, याचा जाब विचारण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथील बांधकाम विभागात गेलो होतो. यावेळी पालकमंत्री दिपक केसरकर यांनी नियमानुसार वर्क ऑर्डर देण्यास सांगितले. मात्र मंत्री मुश्रीफ यांनी काम थांबवल्याचे संजय पाटील त्यांनी स्पष्ट सांगितल्याचे जमादार यांनी सांगितले.