District Liaison Officer Arun Dudhwadkar congratulated Nemale Sarpanch Dipika Bhaire
नेमळे ग्रामपंचायत सरपंचा सौ.दिपिका भैरे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करताना जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी नेमळे गावच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली.
शिवसेना उपनेते तथा जिल्हासंपर्कप्रमुख अरुण दुधवडकर हे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी सावंतवाडी तालुक्यातील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटातून निवडून आलेल्या ग्रामपंचायतीना भेट दिली.यावेळी त्यांनी नेमळे ग्रामपंचायत सरपंचा सौ दिपिका भैरे ,उपसरपंच सखाराम राऊळ तसेच सर्व सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले यावेळी त्यांनी नेमळे गावच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले .यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते ,उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार , तालुका प्रमुख तसेच पंचायत समिती सदस्य रुपेश राऊळ माजी सभापती बाळा गावडे,नेमळे ग्रामपंचायत सर्व सदस्य ,शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
सावंतवाडी / प्रतिनिधी









