शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य
वेंगुर्ले (वार्ताहर)-
शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग डिस्ट्रीक कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने सचिन वालावलकर मित्रमंडळ, वेंगुर्ला यांचेतर्फे बुधवार दि. 29 ऑक्टोबर रोजी नगर वाचनालय सभागृह, वेंगुर्लाच्या सभागृहात जिल्हास्तरीय सुपर सिक्स चॅलेंजर कॅरम स्पर्धा 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या सुपर सिक्सच्या प्रचलीत नियमावलीनुसार खेळविण्यात येतील. खेळाडूंना पांढरा टी शर्ट व फूल पॅन्ट/ ट्रॅक पॅन्ट घालून सामने खेळणे बंधनकारक असेल. विजेत्या स्पर्धकांना रोख रकमेची बक्षिसे व आकर्षक चषक देण्यात येणार आहेत.या स्पर्धेत सहभागी होवू घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी आपली नावे रविवार दि. २६ ऑक्टोबर पर्यंत ओंकार कुबल- (वेंगुर्ला)7387033013,या क्रमांकावर तसेच राजेश निर्गुण (सावंतवाडी), शुक्राचार्य महाडेश्वर (कुडाळ), अनिल कम्मार (कणकवली), प्रकाश प्रभू (देवगड) यांचेकडे दिनांक 26 ऑक्टोबर पर्यंत नावे नोंदवावीत.या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग डिस्ट्रीक्ट कॅरम असोसिएशनचे सचीव योगेश फणसळकर-7620755766 यांच्याशी संपर्क करावा. या स्पर्धेमधे जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे. असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष अँड. अवधूत भणगे व सचिन वालावलकर मित्रमंडळाचे अध्यक्ष संतोष परब यांनी केले आहे.









