क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
सार्वजनिक सार्वजनिक शिक्षण खाते बेळगावी आणि बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय प्राथमिक व माध्यमिक शालेय रोलर स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या स्केटिंगपटूंनी यश संपादन केले.
केएलई स्केटिंग रिंक लिंगराज कॉलेज कॅम्पस बेळगाव येथे 14 वर्षांखालील आणि 17 वर्षांखालील मुले आणि मुली या दोन गटात स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत बेळगाव जिल्हातील 40 स्केटींगपटूंनी भाग घेतला होता. त्यात क्वाड स्केटिंग 14 वर्षाखालील मुलांच्या गटात कृष्णा बस्तवाडी 2 सुवर्ण, सोहम कंग्राळकर 2 रौप्य, रुत्विक दुबाशी 2 कांस्य, 14 वर्षाखालील मुली-जान्हवी तेंडुलकर 2 सुवर्ण, शर्वरी दड्डीकर 2 रौप्य, सई पाटील 2 कांस्य, 17 वर्षांखालील मुलöश्री रोकडे 2 सुवर्ण, साई समर्थ अंजना 2 रौप्य, प्रणव चौगुले 2 कांस्य, 17 वर्षांखालील मुली-विशाखा फुलवाले 2 सुवर्ण, सानिका कंग्राळकर 2 रौप्य, 14 वर्षाखालील मुले इनलाइन स्केटिंग- प्रीतम नीलाज 2 सुवर्ण, सर्वेश कुदळे 2 रौप्य, साईराज मेंडके 2 कांस्य, 14 वर्षाखालील मुलाöरश्मिता अंबिगा 3 सुवर्ण, 17 वर्षांखालील मुले-देवेन बामणे 3 सुवर्ण, 17 वर्षांखालील मुली-करुणा वाघेला 3 सुवर्ण, तुलसी हिंडलगेकर 3 रौप्यपदके मिळविली. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा शारीरिक शिक्षणाधिकारी डी. एस. डीग्रेज यांच्या हस्ते झाले. यावेळी स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगणे, सक्षम जाधव उपस्थित होते.









