वार्ताहर /किणये
द. म. शिक्षण मंडळ संचलित किणये येथील सरस्वती हायस्कूलच्या मुलांच्या कबड्डी संघाने मच्छे येथे झालेल्या क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. यामुळे या संघाची जिल्हा कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या संघात यल्लाप्पा के. बोंजुर्डेकर, यल्लाप्पा टी. बोंजुर्डेकर, सूरज पाटील, परशराम बोंजुर्डेकर, परशराम बामणे, कृष्णा डुकरे, निवृत्ती गुरव, परशराम पाटील, रतन पाटील, श्रीधर दळवी, अनिकेत बामणे, बाळकृष्ण येडगे यांचा समावेश आहे. क्रीडा शिक्षक श्रीकांत पाटील, मुख्याध्यापक आनंद गावडे यांच्यासह गावातील कबड्डी खेळाडू कृष्णा पाटील, ज्ञानेश्वर पाटील, नागेश पाटील व सहशिक्षकांचे sRत्यांना मार्गदर्शन लाभत आहे.









