वार्ताहर /कणकुंबी
शिक्षण खात्यामार्फत खानापूर येथे झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धामध्ये जांबोटी माध्यमिक विद्यालयाने भरघोस यश संपादन केले. विद्यालयाच्या मुलांच्या कबड्डी व व्हॉलीबॉल स्पर्धेत विजेतेपद मिळविले. या दोन्ही संघांची आता जिल्हा पातळीसाठी निवड झाली आहे.
विश्व भारत सेवा समिती संचलित, माध्यमिक विद्यालय जांबोटी या विद्यालयाच्या खेळाडूनी मुलांच्या कबड्डी स्पर्धेत लोंढा संघावर विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यानंतर गर्लगुंजी संघावर 15 गुणांनी मात करून अंतिम फेरीत मजल मारली. अंतिम सामन्यात इटगी संघाबरोबर रोमांचकारी खेळ करीत 5 गुणांच्या फरकाने विजेतेपद पटकावले. या क् कबड्डी संघात वर्षम सावंत, श्रीनिवास नाईक, नयन पाटील, आंsमकार चिगुळकर, आकाश भिंबर, थकाराम जंगले, कृष्णा आवणे, शुभम गुरव, अनंत नाईक, नितेश पाटील यांचा समावेश होता. विद्यालयाच्या मुलांच्या व्हॉलीबॉल संघाने लोंढा संघावर सहज मात केली तर उपांत्य फेरीत गर्लगुंजी संघावर विजय मिळविला. अंतिम सामन्यात बिडी विभागाच्या संघावर 2-1 ने विजय मिळविला. या व्हॉलीबॉल संघात वर्षम सावंत, नयन पाटील, संजय एडगे, संतोष चौगुले, शरद पाटील, निखिल पाटील, भूषण पाटील, प्रसाद एडगे यांचा समावेश होता. कल्लाप्पा घाडीने भालाफेकमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला तर नकुल नंदकुमार देसाईची जिल्हा योगासन स्पर्धेसाठी निवड झाली. त्यांना आरएल पाटील व टीएल बिर्जे यांचे मार्गदर्शन, मुख्याध्यापक महेश सडेकर व इतर शिक्षकांचे प्रोत्साहन लाभले.









