आचरा प्रतिनिधी
त्रिंबक हायस्कूलच्या मैदानात जिल्हास्तरीय शालेय स्तरावर शूटिंगबॉल स्पर्धा चार गटामध्ये आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत नेहमीच शूटिंगबॉल स्पर्धेत वर्चस्व गाजवणाऱ्या त्रिंबक हायस्कुलने स्पर्धेत सातत्य राखत आपले वर्चस्व कायम राखले. या स्पर्धेत जिल्ह्यातून 19 संघानी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा 17वर्षे मुली व मुलगे, 19 वर्षे मुली व मुलगे अशा चार गटात घेण्यात आली.
या स्पर्धेत 17 वर्षे मुलगे वयोगट प्रथम क्रमांक- जनता विद्या मंदिर त्रिंबक, द्वितीय क्रमांक- आर पी डी हायस्कूल सावंतवाडी, तृतीय क्रमांक – सौ ही भा वरस्कर हायस्कूल वराड,17 वर्षे मुली वयोगट प्रथम क्रमांक -जनता विद्या मंदिर त्रिंबक, द्वितीय क्रमांक- सौ हि भा वरस्कर हायस्कूल वराड, तृतीय क्रमांक- शिवाजी विद्यालय काळसे,19 वर्षे मुलगे वयोगट प्रथम क्रमांक -कुडाळ हायस्कूल स्कूल कुडाळ, द्वितीय क्रमांक-टोपीवाला हायस्कूल मालवण, तृतीय क्रमांक -जनता विद्या मंदिर त्रिंबक,19 वर्षे मुली वयोगट प्रथम क्रमांक कुडाळ हायस्कूल कुडाळ, द्वितीय क्रमांक- जनता विद्यामंदिर त्रिंबक, तृतीय क्रमांक- प्रगत विद्या मंदिर रामगड यांनी प्राप्त केला आहे.
मंगळवारी सकाळच्या सत्रात या स्पर्धेचे उदघाटन आचरा गावचे व्यापारी आचरा मेडिकलचे मांगरीष सांबारी यांच्या हस्ते झाले. उद्घाटन प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा डायरेक्ट शूटिंग बॉल असोसिएशनचे जिल्हा सेक्रेटरी सुरेंद्र सकपाळ, जिल्हा संघटक सुभाष तळवडेकर, क्रीडा अधिकारी विजय शिंदे, मालवण तालुका समन्वयक अजय शिंदे, संस्था सेक्रेटरी अरविंद घाडी प्रशालेचे मुख्याध्यापक प्रवीण घाडीगांवकर, क्रीडा शिक्षक महेंद्र वारंग, दिनेश सावंत, शैलेश मुळीक, वैभव कोंडस्कर ,अविनाश परब ,श्रावण गवळी, सागर सावंत , पाताडे सर ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेत पंच म्हणून सिताराम सकपाळ, जयवंत बागवे, राजू भावे, अमेय लेले, सुरेंद्र सकपाळ यांनी काम पहिले.









