कुडाळ : प्रतिनिधी
हुमरस ग्रामस्थ मित्र मंडळाच्या वतीने आकेरी येथील रामेश्वर मंदिरात आयोजित जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेत कुडाळच्या प्राथमिक शिक्षक कलामंचने ( बुवा राजेश गुरव ) प्रथम क्रमांक पटकावला. यावेळी दहा मंडळांना निमंत्रित करण्यात आले होते. या स्पर्धेत भजन रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
श्रावण महिन्यातील शेवटचा श्रावण सोमवारचे औचित्य साधून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन देवस्थान कमिटी अध्यक्ष बाळा राऊळ यांच्या हस्ते व अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. स्पर्धेचा उर्वरित निकाल पुढील प्रमाणे आहे.द्वितीय क्रमांक कलेश्वर पूर्वी देवी भजन मंडळ,( वेतये, बुवा प्रथमेश निगुडकर ) ,तृतीय – साटम महाराज भजन मंडळ ( निरवडे,बुवा नरेन बोंद्रे ) , उत्तेजनार्थ – दिर्बा देवी भजन मंडळ (आकेरी,बुवा भक्ति सावंत ) यांची निवड करण्यात आली.उत्कृष्ट गायक राजेश गुरव ( प्राथमिक शिक्षक कलमंच ), पखवाज – राहुल पांगम (साटम महाराज मंडळ,), झांज – शिवरुद्र सावंत, (दीर्बा देवी मंडळ ), कोरस – गोठण भजन मंडळ ( वजराट ) यांची निवड करण्यात आली. पारितोषिक वितरणप्रसंगी सरपंच सीताराम तेली, उपसरपंच प्रवीण वारंग, माजी सरपंच सोनू मेस्त्रीशिवसेना शिंदे गट शाखाप्रमुख नाथा परब,महेश रमेश वारंग,रामेश्वर देवस्थान कमिटी अध्यक्ष बाळा राऊळ ,बाबू परब,गणेश नाईक,अरुण मेस्त्रीअशोक शिवलकर,प्रताप परब तसेच हुमरस – आकेरी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश तेली यांनी केले.









