वार्ताहर/ कुडाळ
कुडाळ तालुक्यातील तेंडोली – भोमवाडी येथील अनलादेवी कला-क्रीडा मंडळ च्या वतीने दसरो उत्सवा निमित्त तेथीलच अनलादेवी मंदिरात २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता निमंत्रित जिल्हास्तरीय भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तसेच 26 रोजी रात्री 9 वाजता आजगावकर दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे.
22 रोजी होणारी जिल्हा स्तरीय भजने सायंकाळी 6 वाजता सद्गुरू संगीत मंडळ ( कुडाळ) चे भजन, 6.45 वाजता दत्तगुरु भजन मंडळ (वैभववाडी) चे भजन, 7.30 वाजता दत्तकृपा मंडळ (वैभववाडी) चे भजन, रात्री 8.15 वाजता समानदेव मंडळ ( सांगेली) चे भजन, 9 वाजता क्लेश्वर पूर्वी देवी मंडळ (वेत्ये) चे भजन, 9.45 वाजता दत्त मंडळ ( वर्दे) चे भजन, 10.30 वाजता श्री देव रवळनाथ नवतरुण मंडळ (ओटवणे) चे भजन, 11.15 वाजता श्री देव रवळनाथ मंडळ ( पिंगुळी) चे भजन अशी आहेत.
या स्पर्धेसाठी पारितोषिके पुढीलप्रमाणे आहे
प्रथम क्रमांक पाच हजार रुपये, द्वितीय तीन हजार , तृतीय दोन हजार व चषक देण्यात येणार आहे.
वैयक्तिक पारितोषिके उत्कृष्ट गायक, हार्मोनियम, पखवाज वादक, उत्कृष्ट झांजवादक, कोरस यांना पाचशे रुपये मानधन व चषक देण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेतील सहभागी मंडळाना सन्मान चिन्ह व मानधन देण्यात येणार आहे. स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अनलादेवी कला-क्रीडा मंडळ तेंडोली यांनी केले आहे.









