न्हावेली / वार्ताहर
श्री देवी माऊली मंदिर न्हावेली येथे श्री रामनवमी निमित्त शनिवार ५ एप्रिल रोजी सायंकाळी ६ .वाजता जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम पारितोषिक ५००१ रुपये व चषक,द्वितीय पारितोषिक ३००१ रुपये व चषक,तृतीय पारितोषिक २००१ रुपये व चषक,तसेच प्रथम उत्तेजनार्थ १५०१ रुपये व चषक,द्वितीय उत्तेजनार्थ १००१ रुपये व चषक, व इतर उत्कृष्ट गायक,हार्मोनियम,पखवाज,तबला,कोरस,झांज,गजर यांना प्रत्येकी ५०० रुपये व चषक आणि सहभागी भजन मंडळाना सहभाग प्रमाणपत्र व चषक देण्यात येणार आहे.या स्पर्धेत प्रथम आठ संघाना प्रवेश दिला जाईल तरी इच्छुक भजन मंडळांनी १ एप्रिलपर्यत अजय नाईक ७९७२७६१९६८ व रोहित निर्गुण ७८२३०१२५८२ यांच्याशी संपर्क साधावा
Previous Articleइचलकरंजीत कापूस गोदामास आग
Next Article मधमाश्यांच्या हल्ल्यात चौघे जखमी









