वार्ताहर / कुडाळ
तेंडोली येथील श्री देव रवळनाथ पंचायतन मंदीरात सुरेंद्र दत्तात्रय तेंडुलकर चॅरिटेबल ट्रस्ट तेंडोली तर्फे १७ व १८ ऑक्टोबर याकालावधीत गावमर्यादीत व जिल्हास्तरीय भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी पारितोषिके पुढीलप्रमाणे आहेत. गावमर्यादित स्पर्धा पारितोषिके:- प्रथम क्रमांक तीन हजार रुपये, द्वितीय दोन हजार, तृतीय एक हजार रुपये व चषक देण्यात येईल. तसेच उत्कृष्ट गायक, हार्मोनियम, पखवाज, तबला, झांज, कोरस यांना वैयक्तिक पारितोषिके देण्यात येतील.
जिल्हास्तरीय स्पर्धा पारितोषिके:
प्रथम क्रमांक पाच हजार रुपये, द्वितीय तीन हजार रुपये, तृतीय दोन हजार रुपये व चषक देण्यात येईल. उत्कृष्ट गायक, हार्मोनियम वादक,पखवाज,तबला, झांज, कोरस यांना वैयक्तीक पारितोषिके देण्यात येतील. स्पर्धेत नाव नोंदणी करणाऱ्या पहिल्या सात भजन मंडळांचा समावेश केला जाईल. इच्छुक भजन मंडळांनी आपली नावे 14 ऑक्टोबर पर्यंत दिलीप राऊळ मोबाईल नंबर -७६२०७३६६४० यांच्याकडे द्यावीत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.









