आचरा|प्रतिनिधी
इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान आचरा सार्वजनिक गणेशोत्सवा निमित्त 3 आक्टोबर रोजी रात्रौ ठिक 9 वाजता देवूळवाडी पुरस्कृत जिल्हास्तरीय खुल्या फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यस्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी दहा हजार एक रुपये व चषक द्वितीय पारितोषिक सात हजार एक रुपये व चषक, तृतीय क्रमांकासाठी पाच हजार एक रुपये व चषक देण्यात येणार असून उत्तेजनार्थ म्हणून प्रत्येक संघाला 1200 रुपये देऊन गौरविण्यात येणार असून प्रथम येणाऱ्या सात संघाना प्रवेश देण्यात येणार आहे.
आचरा मर्यादित दम बघू दम फुगडी प्रकारांची स्पर्धा
आचरा मर्यादित फुगडी लोककलेतील निवडक खेळांची आव्हानयुक्त क्षमता स्पर्धा दम बघू दम सादर होणार आहे. या स्पर्धेत कोंबडा फुगडी, भोवरा, बसफुगडी, कासवफुगडी या चार प्रकारांचा समावेश असून प्रत्येक फुगडी प्रकारात जास्तीत जास्त सात स्पर्धकांना प्रवेश दिला जाणार आहे. प्रत्येक स्पर्धा प्रकारासाठी प्रथम क्रमांकासाठी -1000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 500 रुपये पारितोषिक दिले जाणार आहे. दोन्ही स्पर्धेत सहभाग दर्शवण्यासाठी अर्जुन बापर्डेकर 9420082320 यांना संपर्क
साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









