तनुज सिंग व वेदा खानोलकर यांना वैयक्तिक विजेतेपद
बेळगाव : युवजन सेवा क्रीडा खाते तसेच जिल्हा प्रशासन व जिल्हा पंचायत यांच्यातर्फे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय दसरा जलतरण स्पर्धा गोवावेस येथील महानगर पालिकेच्या जलतरण तलावात मोठ्या उत्साहात झाल्या. या स्पर्धेत जलतरणपटूंनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता. पुरुष गटात तनुज सिंग तर महिला गटामध्ये वेदा खानोलकर यांनी वैयक्तिक विजेतेपद मिळविले.
जलतरणपटूंची कामगिरी पुढील प्रमाणे
पुरुष गट :- तनुज सिंग 4 सुवर्ण, दर्शन वरूर 3 सुवर्ण, स्वयंम कारेकर एक सुवर्ण 2 कांस्य, अर्णव किल्लेकर एक सुवर्ण एक कांस्य, आदी शिरसाट 4 रौप्य, स्मरण मंगळूरकर 3 रौप्य एक कांस्य, अभिनव देसाई 2 रौप्य 2 कास्य, मयुरेश जाधव, प्रजित मयेकर, सिद्धार्थ कुरुंदवाड यांनी प्रत्येकी एक कांस्य पदक पटकाविले.
महिला गट :- वेदा खानोलकर 5 सुवर्ण, श्रेष्ठा रोटी 2 सुवर्ण एक रौप्य एक कांस्य, निधी मुचंडी एक सुवर्ण 2 रौप्य 2 कास्य, मनस्वी मुचंडी एक सुवर्ण एक रौप्य, प्रणाली जाधव 3 रौप्य एक कांस्य, वैशाली घाटेगस्ती 2 रौप्य 2 कांस्य, ओवी जाधव 2 कांस्य पदके.
वरील स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आबा हिंद स्पोर्ट्स क्लबचे जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार, रणजीत पाटील, संदीप मोहिते, शिवराज मोहिते, कल्लाप्पा पाटील, विजय नाईक, प्रांजल सुळधाळ, शुभांगी मंगळूरकर, विजया शिरसाट, ज्योती पवार, वैभव खानोलकर, विशाल वेसणे, विजय भोगन, किशोर पाटील, मोहन पत्तार ओम घाडी, यांनी विशेष कामगिरी केली. या स्पर्धेमध्ये प्रथम व द्वितीय आलेल्या जलतरणपटूंची बेळगाव विभागीय दसरा जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली असून या स्पर्धा दि. 15 सप्टेंबर रोजी अशोक नगर येथील आंतरराष्ट्रीय महानगरपालिकेच्या जलतरण तलावात होणार आहेत. तरी सर्व विजेत्या खेळाडूंनी सकाळी 10 वाजता हजर राहावे, असे खात्यातर्फे कळविण्यात आले आहे.









