कोल्हापूर
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकारी यांच्या सुसज्ज दालनाचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. नूतनीकरण केलेल्या दालनासह राजर्षी शाहू सभागृह, अभ्यागतांसाठी प्रतिक्षा कक्ष व स्वीय सहायक कक्षाचेही नूतनीकरण करण्यात आले आहे. यावेळी सह-पालकमंत्री माधुरी मिसाळ, खासदार शाहु छत्रपती, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, आमदार डॉ. अशोकराव माने, आमदार शिवाजी पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, इचलकरंजी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे आदी उपस्थित होते.








