मालवण चिवला बीच येथे स्पर्धा ; सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे आयोजन
मालवण । प्रतिनिधी
सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या वतीने घेण्यात येणारी कुमार/कुमारी जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा मालवण तालुका कबड्डी असोसिएशन आणि जय गणेश मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक २० डिसेंबर २०२४ दु. २:०० वा चिवला बिच , सेवांगण आयोजित करण्यात आलेली आहे.सदर स्पर्धा दोन मैदानात सलग खेळवली जाणार असून खेळाडू रजिस्ट्रेशन, वजन कागदपत्रांची पुर्तता इत्यादी बाबी तपासणी दु . १ ते २ या वेळेत करण्यात येईल याकरीता सहभागी होणाऱ्या संघांनी आपले संघ स्पर्धेच्या दिवशी दुपारी १:०० पर्यंत हजर ठेवणे बंधनकारक आहे . स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र प्रदान केली जाणार असून विजेत्या व उपविजेत्या संघांना आकर्षक चषक व प्राविण्य प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेतून निवडलेले कुमार/कुमारी गटाचे संघ पुणे येथे होणाऱ्या ५१ व्या कुमार/कुमारी गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.कुमार/कुमारी गट (२०वर्षाखालील, जन्मतारीख- ०१/०१/२००५,वजन-कुमार गट ७०किलो, कुमारी गट ६५ किलो.) कुमार/कुमारी गट स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी वयाच्या दाखल्याबाबत पुरावा म्हणून १) दहावी व बारावीची परीक्षा दिलेल्या खेळाडूंनी परीक्षा हॉल तिकिटाची रंगीत छायांकित प्रत द्यावी.२) यावर्षी दहावी व बारावी शिकत असलेल्या विद्यार्थ्याने परीक्षा अर्ज भरल्यानंतर प्री लिस्ट ची प्रत मुख्याध्यापकाच्या स्वाक्षरीनिशी द्यावी.३) माध्यमिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी खेळाडूंसाठी शाळेचा यु-डायस नंबर व स्टुडन्ट आयडी असलेल्या बोनाफाईड व निर्गम उताऱ्यावर खेळाडूच्या फोटोवर मुख्याध्यापकाने अर्धसाक्षांकित केलेले असावे.४) इयत्ता पहिली प्रवेश घेतल्याचा निर्गम उतारा ५) आर.टी.ई.२००९ प्रमाणे प्रवेश घेतला असल्यास प्रथम प्रवेश घेतलेल्या शाळेचा यु-डायस व स्टुडन्ट आयडी असलेला निर्गम उतारा किंवा टीसी ची छायांकित प्रत ६)संबंधित खेळाडूचे वय १ वर्षापर्यंत असताना संबंधित शासकीय विभागाने वितरित केलेला जन्मदाखला.७)संबंधित खेळाडूचे वय ५ वर्षापर्यंत असताना संबंधित शासकीय विभागाने वितरित केलेला जन्मदाखला.८)संबंधित खेळाडूंच्या वयाची ५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर संबंधित शासकीय विभागाचा जन्मदाखला असेल तर खेळाडूच्या पहिल्या इयत्तेतील प्रवेश घेतलेल्या जनरल रजिस्टर ची सत्यप्रत अनिवार्य राहील.यावरील पैकी एका जन्मपुराव्या सोबत खालील एक कागदपत्र असणे अनिवार्य आहे.१)आधार कार्ड ची रंगीत छायांकित प्रत व मूळ प्रत.(आधार कार्ड अद्यावत केलेले असावे यामध्ये जन्मतारखेची तारीख/ महिना/ साल स्पष्ट उल्लेख असावा.) २) पासपोर्ट रंगीत छायांकीत प्रत व मूळ प्रत सोबत आणावी.
खेळाडूंच्या अल्पोपाहर व भोजनाची सोय आयोजकांच्या वतीने करण्यात आलेली असून स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनी आपली संघ निश्चिती आपल्या संघाच्या प्रवेश अर्जासोबत व तालुक्याच्या शिफारशीसह दिनांक १८ डिसेंबर २०२४पर्यंत करावयाची आहे.
संघ निश्चिती व अधिक माहीती करीता फेडरेशनचे सहकार्यवाह श्री नितिन हडकर ७२४९३५७२३९ , स्पर्धा संयोजक – श्री ललित चव्हाण व मालवण तालुका कबड्डी असोसिएशन चे सचिव श्री रेनॉल्ड बुतेलो यांच्याशी संपर्क साधावा.









