सिंधुदुर्गनगरी येथे भाजपा कार्यालयासमोर करण्यात आली निदर्शने
सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी
भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या व्यक्तिमत्त्वाची भ्रष्ट नक्कल तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी संसद आवारात केली होती. व त्याचं चित्रीकरण खासदार राहुल गांधी यांनी केले होते. या सगळ्याचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्गनगरी येथे भाजपा कार्यालयासमोर जिल्हा भाजपाच्या वतीने निदर्शने करून निषेध करण्यात आला.
यावेळी जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई, राज्य कार्यकारणी सदस्य बंड्या सावंत, जिल्हाचिटणीस दीपलक्ष्मी पडते, मंडल अध्यक्ष दादा साईल, महिला आघाडी तालुकाध्यक्ष सुप्रिया वालावलकर, रानबांबुळी सरपंच परशुराम परब, रांगना तुळसुली सरपंच नागेश आईर, राजा पडते, मोहन सावंत, पप्या तवटे, निखिल कांदळगावकर, समर्थ राणे, शुभम राणे, सूर्यकांत नाईक, प्रकाश झेंडे, आदी उपस्थित होते.









