पणजी : व्हायब्रंट गोवातर्फे व्हायब्रंट गोवा प्रेरणा पुरस्कार 2023 सोहळ्याचे आयोजन नुकतेच दोनापावला येथील राजभवनच्या दरबार हॉलमध्ये यशस्वीरित्या संपन्न झाला. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, जीआयडीसीचे अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स आणि गोवा व्यवसाय समुदायाचे मान्यवर उपस्थित होते. सीआयआय, जीसीसीआय, जीएसआयए, बीएनआय, एलयूबी, जीटीए, टीटीएजी, एफएसएआय, असोचेम यांसारख्या विविध संस्थांच्या प्रमुखांनी प्रतिनिधित्व केल्यानुसार, व्हीजीआयएने गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा राज्यासाठी केलेल्या योगदानाबद्दल, संपूर्ण गोवा व्यापारी समुदायाच्यावतीने सत्कार करण्यात आला. या सोहळ्यात 16 श्रेणींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्वात मोठा निर्यातदार – मोठे क्षेत्र – डेक्कन फाइन केमिकल्स प्रा. लि., गोव्याचे निर्यातक ा एसएसएमई ा एस्ट्रा काँक्रीट प्रोडटक्स, महिला उद्योजिका ा फिलू मार्टिन्स, पुऊष उद्योजक – साहिल अडवलपालकर, सेवा निर्यातक – ओपन डेस्टिनेशन इन्फोटेक प्रा. लि., गोवा पर्यटन ब्रँड – टाटा समूहाचे इंडियन हॉटेल्स कंपनी लि., गोवा क्रीडाव्यक्ती – पर्ल कोलवाळकर, गोव्यातील कलाकार – सोनिया शिरसाट, अनिवासी गोव्यातील व्यवसाय ा विजय थॉमस ा टँजेंटिया, गोव्यातील प्रेरणादायी तऊण उद्योजक – साईराज धोंड, गोवा विंटेज रिटेलर – जे.के. कवळेकर अँड सन्स., शैक्षणिक संस्था ा डॉन बॉस्को अभियांत्रिकी महाविद्यालय, गोवा रिअल इस्टेट कंपनी ा राजदीप बिल्डर्स, इन्स्पायरिंग गोवन फार्मा कंपनी – इंडोको रेमेडीज लि., प्रेरणादायी बिझनेस हाऊस – फोमेंतो रिसोर्सेस, प्रेरणादायी लाइफ – टाइम अचिव्हमेंट – नंदा (अनिल) एस एन खंवटे, पुरस्कार प्रदान करण्यात आला. व्हायब्रंट गोवा – ड्रोन आणि रोबोटिक्स एक्स्पो समिटसाठी भविष्यातील योजना डिसेंबर 2023 साठी नियोजित आहेत आणि 2024 च्या पहिल्या तिमाहीत आंतरराष्ट्रीय व्यापारावरील व्हायब्रंट गोवा ग्लोबल एक्स्पोची दुसरी आवृत्ती नियोजित आहे.
Previous Articleकाणकोणात एकूण 66 इंच पावसाची नोंद
Next Article गोवुमनियातर्फे उद्योजिकांचा गौरव
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









