संचालक बाबा परब यांची उपस्थिती
मालवण | प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सह. बँक शाखा सुकळवाड मार्फत वाहनकर्ज दिलेल्या वाहनांचे वितरण बँकेचे संचालक संदीप (बाबा) परब यांनी प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी सुकळवाड सरपंच युवराज गरूड, उद्योजक सागर कुशे, गुरुनाथ बांदेकर, मालवण तालुका बचतगट, समुह अध्यक्षा सौ. प्रिती सावंत, जगदीश चव्हाण उपस्थित होते. यावेळी पाच चारचाकी वाहन, दोन रिक्षा, चौदा दुचाकी वाहनांचे वितरण करण्यात आले. यावेळी सुकळवाड बँक शाखेचे काम चांगले असल्याचे उपस्थित अनेक ग्राहकांनी सांगितले. याबाबत अधिकारी, कर्मचारी यांचे चांगल्या सेवेबाबत संचालक बाबा परब यांनी कौतुक केले.









