बी. टी. पाटील फौंडेशनतर्फे उपक्रम
प्रतिनिधी / बेळगाव
एसकेई सोसायटी संचालित ठळकवाडी हायस्कूल येथे बी. टी. पाटील फौंडेशनतर्फे शालेय विद्यार्थिनींना गणवेश वितरण करण्याचा कार्यक्रम नुकताच झाला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आर. आर. कुडतुरकर व प्रमुख पाहुणे म्हणून बी. टी. पाटील फौंडेशनचे कार्यकारी संचालक नवीन पाटील, सचिन पाटील, अमन पाटील व ओमप्रकाश प्रभू उपस्थित होते.
ईशस्तवनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. एस. व्ही. भातकांडे यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला. कुडतुरकर यांच्या हस्ते पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. पाहुण्यांच्या हस्ते 37 विद्यार्थिनींना गणवेश देण्यात आले. सूत्रसंचालन सी. वाय. पाटील यांनी केले. एस. टी. पाटील यांनी आभार मानले.









