वेंगुर्ले (वार्ताहर)-
वेंगुर्ले तालुका शिवसेनेच्या माध्यमातून आणि या मागाचे आमदार तथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या वतीने शुक्रवारी वेंगुर्ले शहरातील भाजीविक्रेते तसेच इतर किरकोळ वस्तूंचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांना मोठ्या छत्र्यांचे वाटप करण्यात आले. वेंगुर्ले शहरातील पवनपुत्र भाजी मंडई येथे छत्री वाटपाचा हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहरप्रमुख उमेश येरम, जिल्हा संघटक सुनील डुबळे, युवासेनेचे संतोष परब, दाभोली ग्रामपंचायत सदस्य एकनाथ राऊळ तसेच समाधान बांदवलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी भाजी मंडई मधील सुजाता एकनाथ कासकर, अक्षता गुरुनाथ कांबळी, अनिल खानोलकर, भाई घाटकर, साईनाथ खवणेकर, सदानंद शारबिद्रे, तनुजा नवार, रंजना परब, आंतोन डिसोजा यांच्यासह स्थानिक विक्रेत्यांना या छत्र्यांचे वाटप करण्यात आले.









