सावंतवाडी प्रतिनिधी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधानसभा अध्यक्ष विक्रांत सावंत यांच्यातर्फे कासारवाडा प्राथमिक शाळा नंबर २ येथील मुलांना शैक्षणिक साहित्य छत्र्या वाटप करण्यात आल्या. यावेळी तालुका संघटक भारती कासार, शाखा संघटक नरहरी शिरोडकर, शाखा संघटक सपना पेडणेकर ,व शाळेतील शिक्षक ,ग्रामस्थ उपस्थित होते. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या माध्यमातून नेहमीच विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला जात आहे . असे कासार यांनी स्पष्ट केले. माजगाव भागातील शैक्षणिक विकासासाठी नेहमीच विक्रांत सावंत सहकार्य करत आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.









