बेळगाव : लोककल्प फौंडेशनच्यावतीने खानापूर तालुक्यातील गोल्याळी येथील सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याचे वितरण करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांना खेळांबद्दल रुची निर्माण होण्यासाठी लोककल्प फौंडेशनने साहित्य दिले आहे. फुटबॉल, व्हॉलिबॉल, बास्केट- बॉल, क्रिकेटचे साहित्य, बॅडमिंटन रॅकेट, दोरीउड्या, कॅरम यासह इतर साहित्याचा समावेश आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना क्रीडाप्रकारांविषयी माहिती मिळावी, हा यामागील उद्देश होता. लोकमान्य समूहाचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम राबविला जात आहे. शाळेतील शिक्षक तसेच विद्यार्थ्यांनी लोककल्प फौंडेशनचे आभार मानले. यावेळी लोककल्प फौंडेशनचे सूरजसिंग रजपूत, रितेश पोटेकर, संतोष कदम यांच्यासह इतर उपस्थित होते.
Previous Articleव्यसनमुक्ती कार्यात जनतेचे सहकार्य मोलाचे
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









