वाळपई / प्रतिनिधी
वेळगे येथील श्रीमती विद्यालयाने शाळेच्या सुऊवातीलाच पर्यावरण पूरक देखावे करून मुलांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. पहिल्या दिवशी मुलांना पर्यावरणाच्या माध्यमातून उत्साहित करण्याच्या दृष्टिकोनातून सीडबॉलचे वितरण करण्यात आले. सदर सिडबॉल पावसाळ्यात रानामध्ये फेकण्यात येणार आहेत .यातून वेगवेगळ्या प्रकारची झाडे निर्माण होणार असून पर्यावरणाला या शाळेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सहकार्य करण्यात येणार असल्याची माहिती विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका चित्रा परांजपे यांनी दिली. या संकल्पनेला विवेकानंद पर्यावरण जागृती फौजेचा पाठिंबा लाभल्याचे विद्यालयाचे कला शिक्षक योगेश कवठणकर यांनी सांगितले.