विविध शैक्षणिक संस्थांचाही होणार गौरव
पणजी : राज्यातील शिक्षकांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गोवा सरकारच्या शिक्षण खात्यामार्फत दरवर्षी राज्य पुरस्काराने गौरविण्यात येते.य्ंिंदाचा हा पुरस्कार वितरण सोहळा 5 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता कला अकादमीत होणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, शिक्षण खात्याचे सचिव प्रसाद लोलयेकर, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. देण्यात येणाऱ्या राज्य शिक्षक पुरस्कारामध्ये दहा जणांचा समावेश आहे. या शिवाय या कार्यक्रमात शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या ‘म्हाजी लॅब बरी लॅब’ या स्पर्धेतील विजेत्यांनाही गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातील 13 स्पर्धक सहभागी झाले होते. ‘म्हाजी लॅब बरी लॅब’ या स्पर्धेतील विजेत्या शिक्षणसंस्थांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमातच रिसर्च वेल्फेअर फंडासाठी निधी जमवलेल्या राज्यातील प्रत्येक तालुक्यातील शाळांचाही गौरव करण्यात येणार असून, सर्वाधिक निधी प्राप्त करून देणाऱ्या शिक्षणसंस्थांचा यामध्ये समावेश असणार आहे.








