300 रुग्णांना होणार लाभ : बीसीजी लसीकरणाला प्रारंभ
बेळगाव : जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खाते, जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण संघ, क्षयरोग नियंत्रण विभाग, वैद्यकीय विज्ञान संघ, हिंडाल्को इंडस्ट्रीज प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने वडगाव येथील जिल्हा क्षयरोग नियंत्रण अधिकारी कार्यालयात क्षयरोग रुग्णांना पौष्टिक आहार किटचे वाटप करण्यात आले. डॉ. ए. पी. गडाद म्हणाले, क्षयरोग निर्मूलनासाठी पौष्टिक आहाराचे सेवन आवश्यक आहे. यासाठी रुग्णांनी पौष्टिक आहारावर भर द्यावा, शिवाय धूम्रपान, मद्यपान आणि तंबाखू सेवन टाळावे. जिल्हा क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ. चांदणी देवडी म्हणाल्या, क्षयरोग निर्मूलनासाठी पौष्टिक आहार गरजेचा आहे. रोग नियंत्रणासाठी दैनंदिन आहारात पौष्टिक आहार घ्यावा. यावेळी 60 लाभार्थ्यांना पोषण आहार किटचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील 300 रुग्णांना पौष्टिक आहार किटचे वाटप करण्यात येणार असल्याची माहितीही हिंडाल्को कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.याप्रसंगी डॉ. सतीश घाटगे, दिनेश नायक, डॉ. ज्योत्स्ना, डॉ. रमेश दंडगी, डॉ. बी. एस. तुक्कार यासह आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी कार्यकर्त्या, विविध संघांचे पदाधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि स्वयंसेवक उपस्थित होते.
मोफत लसीकरण
रोग प्रतिकारशक्ती कमी असलेल्या नागरिकांना बीसीजी लसीकरण करण्यात येणार आहे. व्यसन असलेल्या आणि 60 वर्षांवरील नागरिकांना सरकारी दवाखान्यात ही लस मोफत दिली जाणार आहे. या लसीकरण उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे.









