बेळगाव :
श्री अन्नपूर्णा महिला को-ऑप. क्रेडिट सोसायटीतर्फे गुणवंतांचा गौरव व गरीब व होतकरू मुला-मुलींना वह्यांचे वाटप करण्यात आले. अनगोळ रोड येथील श्री अन्नपूर्णा महिला सोसायटीतर्फे नुकताच गुणी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. गरीब होतकरू मुला-मुलींना वह्यांचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी सोसायटीच्या सुनीता अष्टेकर होत्या. प्रारंभी गुणवंत व गरीब होतकरू मुलांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. उपस्थित सुनीता अष्टेकर, चेअरपर्सन रूपा नेसरकर, संचालिका सुलभा भोसले, लक्ष्मी हिरोजी, अर्चना पाटील यांच्या हस्ते रोख रक्कम देऊन गुणी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. गरीब होतकरू मुला-मुलींना वह्यांचे वाटप करण्यात आले. कमल खणगावकर यांनी आभार मानले.









