कसबा बीड / प्रतिनिधी
ग्रामपंचायत शिरोली दुमाला यांच्या वतीने १५ व्या वित्त आयोगाच्या निधीमधून गावातील नऊ अंगणवाडी यांना टी व्ही संच, संगणक व प्रिंटर संच मुलांना शुद्ध व स्वच्छ पाणी मिळावे यासाठी वॉटर फिल्टर प्युरीफायर अंगणवाडीसाठी आवश्यक साहित्य, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र शिरोली दुमाला यांना संगणक संच व वाटर हिटर केंद्र शाळा दुमाला यांना शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आर ओ प्लांट व साऊंड सिस्टिम या वस्तूंचे वाटप करण्यात आले. असे एकूण सरासरी दहा लाख रुपये किमतीचे साहित्य १५ व्या वित्त आयोगा या निधीतून ग्रामपंचायत शिरोली दु. यांच्या वतीने देण्यात आले या कार्यक्रमा वेळी गोकुळचे चेअरमन विश्वास नारायण पाटील यांच्या हस्ते व गावच्या सरपंच सौ.रेखा कांबळे यांच्या उपस्थित साहित्य वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक मच्छिंद्र कांबळे सर तर आभार केंद्र शाळा उप मुख्याध्यापक नामदेव पाटील यांनी मानले. या कार्यक्रमा वेळी ग्रामपंचायत शिरोली दुमालाचे सरपंच रेखा कांबळे, डे.सरपंच सचिन विश्वासराव पाटील , वीरशैव बँकेचे संचालक अनिल सोलापूर,ग्रामपंचायत सदस्य एस के पाटील, ग्रामविकास अधिकारी सागर पोवार,प्राथमिक आरोग्य केंद्र मधुरा मोरे,अच्युत पाटील, एकनाथ भोपळे, रमेश कांबळे, शीला शेटे,वैशाली कांबळे, अंगणवाडी सेविका सुवर्णा कुंभार, राजश्री कोईगडे,स्मिता पाटील, शालन कांबळे,तसेच ग्रामपंचायत चे सर्व सदस्य व ग्रामस्थ अंगणवाडी सेविका प्राथमिक आरोग्य केंद्राची कर्मचारी उपस्थित होते.